स्वाध्याय
प्र.१) थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले ?
उत्तर :- सेनापती बापट यांचे स्वच्छतेचे काम गावकऱ्यांना पसंत नव्हते. असले साफसफाईचे हलके काम तात्यांनी करू नये असे गावकर यांची इच्छा होती. सेनापती बापट गावकर्यांना म्हणाले जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते. सफाईच्या कामात काहीही वाईट नाही. लोकांच्या मते परिवर्तन करताना सेनापती बापट यांना गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले.
आ) भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे ?
उत्तर:- लेखक म्हणतात, 'वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण ती जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतो असं नाही' म्हणून माझा शब्द इथे वापरला आहे.
इ) तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला ?
उत्तर :- सफाईचे काम हलके काम आहे असे गावकरी समजत होते. सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या वृत्ती हळूहळू नकळत बदल होत गेला. व लोकांच्या सफाई मोहिमेत सामील झाले.
ई) थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात ?
उत्तर :- थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात. त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्शवत वृत्तीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात.
प्र.२) तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
अ) तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता ?
उत्तर :- आम्ही आमच्या शाळेमध्ये स्वच्छता मोहीम आठवड्याच्या शेवटी राबवतो.
आ) जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशाकशाची साफसफाई करता ? का ?
उत्तर :- आम्ही आमच्या शाळेमध्ये स्वच्छता राबवताना आमच्या वर्गाची , शाळेच्या परिसराची , मैदानाची व आजूबाजूचा परिसर याची आम्ही स्वच्छता करतो कारण की पर्यावरणाची स्वच्छता करणे हे आपले कर्तव्य आहे व पर्यावरण स्वच्छ केल्याने आपला परिसर स्वच्छ राहतो व त्याने आपल्या सर्वांना फायदा होतो.
इ) तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्या ? आठ ते दहा ओळी लिहा.
उत्तर :- मी माझ्या मित्राला पटवून देईल की आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत आपले शरीर चांगले ठेवले तर आपले मन स्वच्छ होते आपले घर आपली शाळा आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा. आपण घाणेरडे राहिलो, कुठेही कचरा करून ठेवला तर त्याचा संसर्ग इतरांना होतो सर्वांचे आरोग्य बिघडते. आपल्याला निरोगी जीवन जगायचं असेल तर आपल्याला काय आपल्यापासून आपण स्वच्छता राखली पाहिजे. खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण काळजी घ्यायला हवी. ठिकाणी आपण स्वच्छता पाळायला हवी. ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी हेच खरे मी हे माझ्या मित्राला पटवून देईल व त्याला स्वच्छतेचे महत्त्व समजून देईन.
ई ) आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा.
उत्तर :- माझी शाळा , बाग , मैदाने , मंदिरे , बाजारपेठा , भाजीमंडई
सेनापती बापट. |