६ .अश्मयुगीनः दगडाची हत्यारे
स्वाध्याय
प्र.१ ) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ ) ज्या काळातील हत्यार यामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण _______असे संबोधतो.
अ )ताम्रयुग
आ )अश्मयुग
इ )लोहयुग
उत्तर :- अश्मयुग
आ ) महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे _______ हे स्थळ प्रसिद्ध आहे.
अ ) गंगापूर
आ ) सिन्नर
इ ) चांदवड
उत्तर :- गंगापुर
प्र.२ ) खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळाची चुकीची जोडी ओळखा.
अ ) राजस्थान - बागोर
आ ) मध्यप्रदेश - भिंबेटका
इ ) गुजरात - लांघणज
ई ) महाराष्ट्र - विजापुर
उत्तर :- महाराष्ट्र - विजापूर
प्र.३) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ ) आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला ?
उत्तर :- दगडाची हत्यारे बनवण्यासाठी पुराश्म युगातील मानवाने 'आघात तंत्राचा' वापर केला. या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एकाच बाजूला धार केल्याने तोडहत्यारे तयार केली. दगडाचे छोटे शेळके काढण्यासाठी ताठ कण्याच्या मानवाने सांबरशिंगयासारख्या वस्तूंचा घण तयार करून आघात तंत्राच्या साह्याने वेगवेगळी हत्यारे बनवली.
आ ) बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्यात या तंत्रात कोणती क्रांती केली ?
उत्तर :- बुद्धिमान मानवने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात त्याने दगडा पासून लांब व पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब व त्यांपासून त्याने सुरी , तासणी , टोच्या यासारख्या विविध प्रकारची हत्यारे बनवली. गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड , हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग तो हत्यारे बनवण्यासाठी करू लागला .
प्र.४ ) पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा.
उत्तर :- मानवाने या कालखंडात त्यांच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली. हत्यारांमध्ये प्रगती होत गेली. प्रत्येक युगात मानवाने तयार केलेल्या हत्यारांचा तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे :
● पुराश्मयुग :-
या युगातील सुरुवातीला मानवाने आघात तंत्राचा वापर केला व त्यापासून दगडी हत्यारे बनवली. या हत्यारांचा एकाच बाजूला धारा असे. तसेच कुशल मानवाने अशा चाचण्या, जोडहत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड असत. परंतु ताठ कण्याचा मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड , फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली. बुद्धिमानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पातं पासून सुरी , तासणी , टोच्या , छिन्नी अशी हत्यारे तयार केली
● मध्याश्मयुग :-
या युगातील मानव शिकारीसाठी टोकासारखे दगडी सूक्ष्मास्त्रे बनवली. मासेमारीसाठी गळ तयार केले. दातेरी सुरी यासारखी अवजारे बनवणे
● नवाश्मयुग :-
या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेले दगडाची हत्यारे तयार केले.
प्र.५ ) पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो ?
अ ) मिक्सर
आ ) पिठाची चक्की
इ ) मसाला कांडप यंत्र
उत्तर :- पिठाची चक्की.