Responsive Advertisement
       १४ . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

                          स्वाध्याय



प्र. १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१ ) शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली ?

उत्तर :- शिकारीला गेलेल्या राजाने 'यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही' अशी शपथ घेतली.
 
२ ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण कोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत ?

उत्तर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी , उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत.

३ ) तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

उत्तर :- तुकडोजी महाराज यांनी 'ग्रामगीता' हा ग्रंथ लिहिला.

प्र. २ ) का ते लिहा.

१ ) एक राजाने शिकार करण्याचे सोडले.

उत्तर :- तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली ; म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले.

२ ) चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना 'देवबाबा' म्हणत.

उत्तर :- तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान  होऊन अशी गात असत की लोक तासन्तास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना 'देवबाबा' म्हणत.

३ ) राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा 'राष्ट्रसंत' पदवीने गौरव केला.

उत्तर :- तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले, म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा 'राष्ट्रसंत' पदवीने गौरव केला.

प्र. ३) तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

१ ) श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोण कोणते उपक्रम राबवले ?

उत्तर :- १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वतंत्र भारतात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे भरीव कार्य केले. या सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्याचा सहभाग घेतला. गुरुदेव सेवा मंडळाने  वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी स्वच्छता, यात्रा शुद्धी, व्यसनमुक्ती,आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले. सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्मजाती-पंथातील विषमता कमी केली.

 २ )  साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी काय केले ?

उत्तर :- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता. तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.

३ ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले ?

उत्तर :- जपानमध्ये 'विश्वशांती परिषद' व 'जागतिक धर्मपरिषद' आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धाच्या पंचशील तत्त्वांची माहिती सांगितली. तेथे १८ देशांची जागतिक धर्म संघटना गठित करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले.      

Post a Comment

Previous Post Next Post